Farmer ID Kasa Kadhava शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं एक ओळखपत्र केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे. त्याला आपण फार्मर आयडी किंवा शेतकरी ओळखपत्र म्हणून ओळखतो. अजून बऱ्याच शेतकऱ्यांनी काढलेलं नाही, आणि फार्मर आयडी कार्ड पिक विमा किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता आवश्यक असणार आहे.
त्यामुळे फार्मर आयडी ऑनलाईन कसा काढायचा 2025 तेही घरबसल्या मोबाईलवरून काढू शकता याची संपूर्ण प्रोसेस आज लेखांमध्ये खाली दिलेली आहे. सदर दिलेली माहिती वाचून तुम्ही घरबसल्या या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढू शकतात.
Farmer ID Kasa Kadhava फायदे कोणकोणते..?
फार्मर आयडी ज्या शेतकऱ्यांनी काढले त्यांना एक नवीन डिजिटल ओळख मिळवून देण्यासाठी हे 16 अंकी फार्मर आयडी हा देण्यात आला आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे सातबारा उताराच्या आधारे हे 16 अंकी डिजिटल फार्मर आयडी तयार केले जातो.
शेतकऱ्यांची माहिती यामध्ये एकत्र असते, सरकारी लाभ एकाच ठिकाणी आणि पारदर्शकपणे या ठिकाणी मिळवा यासाठी केंद्र सरकारने ही योजना फार्मर आयडी नावाने सुरू केलेली आहे.
फार्मर आयडी कोणकोणत्या योजनांसाठी अनिवार्य लिस्ट.?
प्रधानमंत्री पिक विमा योजना
फळपीक विमा
ठिबक सिंचन योजना
कृषी यांत्रिकीकरण योजना
सौर पंप योजना
पशुपालन लोन योजना
या अशा सर्व योजनांसाठी आता फार्मर आयडी असणे अनिवार्य आहे. तुम्ही काढला नसेल तर खालील माहिती वाचून फार्मर आयडी मिळवायचा आहे.
फार्मर आयडी फार्मर आयडी नोंदणी कशी करावी
फार्मर आयडी काढणे अगदी सोपे आहे. तुम्ही जवळील आपले सरकार सेवा केंद्र, तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्या मदतीने काढू शकता. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ऑनलाईन मोबाईल वरून घरबसल्या तुम्ही फार्मर आयडी मिळू शकता. फार्मर आयडी ऑनलाइन माध्यमातून कसा तयार करायचा?? यासाठी खाली देण्यात आलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे.
येथे पहा फार्मर आयडी ऑनलाईन कसा काढावा…?
फार्मर आयडी आवश्यक कागदपत्रे 2025
आधार कार्ड
सातबारा उतारा
बँक पासबुक
मोबाईल नंबर
इत्यादी आवश्यक
इतर आवश्यक असलेले कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे.