Atal Bandhkam Kamgar Awas Yojana या योजनेची आज आपण माहिती घेणार आहोत. याचे अर्ज कसे करायचे आहेत.? आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेअंतर्गत 2 लाख रुपये पक्क घर बांधण्यासाठी कसे मिळवायचे आहे? यासाठी पात्रता, कागदपत्रे, आणि इतर संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण महामंडळ अंतर्गत अट्टल बांधकाम कामगार आवास योजना 2025 ही सुरू करण्यात आलेली आहे.
आता या योजनेतून लाभ कसा घ्यायचा? हे आपण थोडक्यात आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम ही योजना 2018 मध्ये सुरू करण्यात आली आहे, आणि शहरी आणि ग्रामीण भागात कामगारांसाठी मोठी आधार असलेली ही योजना आहे. त्यामुळे या योजनेची सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत.
Atal Bandhkam Kamgar Awas Yojana 2025 फायदे
अटल बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र यांतर्गत राबवली जाते. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन/ऑफलाइन दोन्ही माध्यमातून आहे आता या योजनेत मिळणारे फायदे कोणकोणते लिस्ट खाली दिलेली आहेत.
शहरी भागातील कामगारांसाठी : 2 लाख आर्थिक मदत
ग्रामीण भागातील कामगारांना : ₹1.50 लाख रुपये
शौचालय योजना लाभ : ₹12,000 हजार रुपये अतिरिक्त
म्हाडा फ्लॅटमध्ये सवलतीने घर मिळण्याची संधी
गृहकर्ज घेतल्यास 2 लाख रुपयांची कर्जमाफी (लोन लाखापेक्षा जास्त)
अटल बांधकाम कामगार योजना पात्रता व अटी 2025
अटल बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वरील पद्धतीने तुम्हाला अनुदान आणि अतिरिक्त लाभ सुद्धा हा मिळतो. आता इमारत बांधकाम कामगार अंतर्गत राबवण्यात येणारी अटल बांधकाम कामगार आवास योजना या अंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्रता काय? ही सर्वप्रथम समजून घेऊया.
अर्जदार कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
बांधकाम कामगार म्हणून मंडळामध्ये नोंदणी असणे आवश्यक
वय 18 ते 60 वर्ष दरम्यान
गेल्या 365 दिवसांमध्ये 90 दिवस बांधकाम क्षेत्रात काम केल्याचे प्रमाणपत्र
अर्जदारांकडे पक्क घर नसावं
स्वतःचे नावाचे बँक खाते
वरील लाभार्थी या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजनेसाठी पात्र असतील आणि या लाभार्थ्याकडे स्वतःचे बँक खाते असावे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना आवश्यक कागदपत्रे लिस्ट
आधार कार्ड
90 दिवसाचं काम केलेच प्रमाणपत्र
रहिवासी प्रमाणपत्र
वयाचा दाखला
ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
बँक खाते पासबुक
राशन कार्ड
आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर
योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अटल बांधकाम कामगार आवास योजने संदर्भात माहिती मिळू शकतात.
अटल बांधकाम कामगार आवास योजना ऑनलाइन अर्ज 2025 कसा करावा.?
सर्वात अगोदर बांधकाम कामगार mahabocw.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या
त्यानंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना अर्ज फॉर्म काढून घ्या
फॉर्ममध्ये देण्यात आलेली सर्व माहिती भरा
त्यासोबत सांगितलेली कागदपत्रे जोडा
हा फॉर्म तुम्ही सीएससी केंद्र मार्फत किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अपलोड करू शकता
अर्ज केल्यानंतर Claim Appointment Date हा निवडा
अर्जाची पावती प्रिंट करायची
योजनेनुसार तालुका किंवा जिल्हा कार्यालयात अर्जाची पडताळणी केली जाईल
त्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर अर्ज सादर करावा
योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.
अटल बांधकाम कामगार आवास योजना फॉर्म पीडीएफ
- ग्रामीण भागासाठी : फॉर्म पीडीएफ
- शहरी भागासाठी : फॉर्म पीडीएफ
अटल बांधकाम कामगार आवास योजना लाभार्थी लिस्ट कशी पहावी.?
सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
त्यानंतर बेनिफिट डिस्ट्रीब्यूटर स्कीम्स बेनिफिट Transferred यावर क्लिक करा
त्यानंतर तुमचं जिल्हा योजना नाव बँक इत्यादी माहिती भरून तपशील तुम्हाला पाहता येतो
अशा पद्धतीने या ठिकाणी Atal Bandhkam Kamgar Awas Yojana महत्त्वाची आहे, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.