बांधकाम कामगारांना वार्षिक 12 हजार रुपये मिळणार पहा पात्रता कागदपत्रे Bandhkam Kamgar Pension Yojana

Published On: June 27, 2025
Follow Us
Bandhkam Kamgar Pension Yojana

Bandhkam Kamgar Pension Yojana बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अनेक विविध योजना इमारत बांधकाम व कामगार मंडळ या अंतर्गत राबवली जाते. यात सर्वात महत्त्वाची नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे, बांधकाम कामगार यांना 12 हजार रुपये वार्षिक देण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता.? याची माहिती आज थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

बांधकाम कामगारांना आता ₹12,000 पर्यंत वार्षिक पेन्शन या ठिकाणी दिली जाणार आहे, याची माहिती आपण समजून घेऊया. राज्यातील अनेक कामगारांनी आयुष्यभर कष्ट करून समाजासाठी अन् विकासासाठी अनेक मोठं काम केले आहे. आता महाराष्ट्र शासनाने नवीन कामगारांसाठी योजना सुरू केलेली आहे, आता या योजनेतून 60 वर्षावरील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्यांच्या सेवेनुसार ही पेन्शन दिली जाणार आहे.

Bandhkam Kamgar Pension Yojana किती पेन्शन मिळेल.?

तुम्ही बांधकाम कामगार नोंदणीकृत असाल 60 वर्षे तुमचं वय असेल तर या ठिकाणी महत्त्वाची माहिती आहे. पेन्शन किती मिळेल तर ते खालील प्रमाणे काम केलेल्या वर्षांवर ठरवले जाईल.

  • 10 वर्ष सेवा काम केलं असेल : ₹6000 व वार्षिक पेन्शन
  • 15 वर्षे सेवा काम असेल : ₹9,000 हजार रुपये वार्षिक पेन्शन
  • 20 वर्षे किंवा अधिक सेवा असेल : ₹12,000 रुपये वार्षिक पेन्शन

अशी या ठिकाणी पेंशन मिळणार आहे, महत्वाचे म्हणजे यामध्ये जर दोघेही म्हणजेच पती आणि पत्नी यांनी काम केलेले असेल पात्र असेल तर यांना लाभ मिळू शकतो.

बांधकाम कामगार पेन्शन योजना पात्रता निकष 2025

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा
कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत असावा
10 वर्ष सेवा आवश्यक
वय 60 वर्षे किंवा अधिक
अर्जदार सध्या इतर कोणते पेन्शनचा लाभ घेतलेला नसावा

ही लाभार्थी पात्र या बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी असणार आहे, अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे.

बांधकाम कामगार पेन्शन योजना आवश्यक कागदपत्रे 2025

आधार कार्ड
बांधकाम कामगार नोंदणी प्रमाणपत्र
जन्म दाखला
वयाचा पुरावा
रहिवासी दाखला
अनुभव प्रमाणपत्र
बँक खाते पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
मोबाईल नंबर
इतर आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी लागू आहेत.

बांधकाम कामगार पेन्शन योजना अर्ज कसा करावा.?

बांधकाम कामगार पेन्शन योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यामध्ये दोन प्रकार असून ऑनलाइन आणि ऑफलाइन आहे.

  • ऑनलाईन अर्ज : अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ यावर जाऊन अर्ज सादर करत येतो
  • ऑफलाइन अर्ज प्रक्रिया : बांधकाम कामगार कल्याण मंडळात जाऊन अर्ज हा जमा करावा लागतो.

ही योजना राज्यातील लाखो निवृत्त कामगारांसाठी दिलासा देणारी आहे, आता ही योजना लाभ फक्त जे निवृत्त आहे साठ वर्षापेक्षा जास्त वय आहे त्यांना या ठिकाणी वार्षिक 12 हजार रुपये अशी पेन्शन या ठिकाणी दिली जाणार आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment