Mahabhumi Whatsapp Yojana महाराष्ट्र शासन वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम घेऊन येत आहे, आणि हाताचा सर्वात महत्त्वाचा उपक्रम शासनाने हाती घेतलेला आहे. तो उपक्रम म्हणजे जमिनीचे कागदपत्रे व्हॉट्सॲप द्वारे डिजिटल स्वरूपामध्ये थेट त्यांच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने नवीन डिजिटल क्रांतिकारी उपक्रम हाती घेतलेला आहे.
ही सेवा आता व्हॉट्सॲपला मिळणार आहे, तर कोणती सेवा ? कशा पद्धतीने तुम्हाला व्हॉट्सॲप वर भूमी अभिलेख अंतर्गत येणाऱ्या जमिनीचे कागदपत्रे हे तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत.
सुविधेचे नाव | व्हॉट्सॲप द्वारे जमिनीचे कागदपत्रे |
सुरू केलेले विभाग | भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य शासन |
लाभार्थी कोण | शेतकरी आणि ज्या नागरिकांकडे जमीन असेल |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत वेबसाईट | अधिकृत वेबसाईट |
सुविधा सुरू होण्याची तारीख | 1 ऑगस्ट 2025 पासून अंमलबजावणी |
हे सध्याचे धावपळीच जग आहे आणि यामध्ये डिजिटल युग असल्याकारणाने आता सर्वच माहिती डिजिटल मिळवणे सर्व लोकांना हवे आहे. यातच आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा नवीन निर्णय घेतलेला आहे तो व्हॉट्सॲप वर जमिनीचे कागदपत्र देण्याचा आता 01 ऑगस्ट 2025 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या व्हाट्सअप मोबाईलवर ही सर्व कागदपत्रे या ठिकाणी मिळणार आहेत.
Mahabhumi Whatsapp Yojana 2025
भूमी अभिलेख विभागाचा हा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी आहे. यामध्ये आठ अ किंवा जमिनीची इतर कागदपत्रे ही सर्व कागदपत्रात ऑनलाईन व्हॉट्सॲप वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
ही सेवा कशी असणार ? तर या सेवेनने डिजिटल क्रांतीमुळे शेतकऱ्यांना त्यांचे महत्त्वाचे कागदपत्रे मोबाईल वरती मिळणार आहे. महा-ई-सेवा केंद्र सातबारा, जमिनीचा दाखला घेण्यासाठी कागदपत्रासाठी 30 रुपये 40 रुपये आकारले जातात. आता ऑनलाईन पद्धतीने 15 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना व्हॉट्सॲपवर मिळणार आहे.
महाभुमिअभिलेख विभाग व्हॉट्सॲप सातबारा ही सेवा 01 ऑगस्ट 2025 पासून सुरु करणार आहेत. हे देखील असे माहिती आहे, आता या संदर्भातील सविस्तर माहिती देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे.