Pipe Line Anudan Yojana 2025 शेतकऱ्यांना पाईपलाईन खोदण्यासाठी अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरू

Published On: June 26, 2025
Follow Us
Pipe Line Anudan Yojana

Pipe Line Anudan Yojana तुम्ही तुमच्या शेतामध्ये पाईपलाईन करायची असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे हवं तेवढं आर्थिक भांडवल नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला आज महत्त्वाच्या योजनेची माहिती देणार आहे. तुम्हाला माहीतच ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासाठी 80% पर्यंत अनुदान मिळतं. परंतु आता पाईपलाईनसाठी सुद्धा शासनाने अनुदान देण्यास सुरुवात केलेली आहे.

आता पाईपलाईन अनुदानसाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज सुरू आहेत. ऑनलाईन अर्ज कसे करायचे? याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहेत. पीव्हीसी पाईप्स याचबरोबर एचडीपी पाईप यासाठी अनुदान केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अनुदान देण्यात येतं. पीव्हीसी, एचडीपीसाठी अनुदान मिळतं.

ज्या ठिकाणी जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर ऑनलाईन माध्यमातून अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानंतर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येण्यास सुरुवात होते. महाडीबीटी लॉटरी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना मेसेज येण्यास सुरुवात झाली आहे, अर्ज केल्यानंतर अशा शेतकऱ्यांना पुढील सात दिवसांमध्ये कागदपत्रे अपलोड करण्यास सांगतात.

Pipe Line Anudan Yojana किती अनुदान मिळतं?

2025 मध्ये तुम्ही पीव्हीसी पाईप, एचडीपी पाईपसाठी ऑनलाईन अर्ज करून अनुदान मिळवता येते. या योजनेतून तुम्हाला 100% व 50% अशा पद्धतीने अनुदान देण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती अशा दोन योजना आहे. पीव्हीसी पाईप आणि एचडीपी पाईपसाठी 428 रुपये मीटर पर्यंत 100% अनुदान या ठिकाणी मिळतं. 

एससी एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान आहे. सर्व साधारण गटातील शेतकऱ्यांना पीव्हीसी, एचडीपी पाईप 50 रुपये प्रति मीटर, तर पीव्हीसी पाईप साठी 35 रुपये प्रति मीटर अशी मर्यादा आहे. जवळपास 15000 अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळू शकत, अशी माहिती आहे. आता यासाठी कागदपत्रे कोणती लागतात आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे दिलेली आहे.

पीव्हीसी पाईप अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे लिस्ट?

पीव्हीसी पाईप, एचडीपी पाईप अनुदानावर घ्यायचे असतील तर यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

  1. आधार कार्ड
  2. बँकेचे पासबुक
  3. सातबारा उतारा
  4. ज्यासाठी निवड झाली कोटेशन 

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर पूर्वसमंती मिळते, त्यानंतर पूर्ण पाईप खरेदी करायची आहे, खरेदीचे बिल पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करायचे अशा पद्धतीने या ठिकाणी लाभ मिळतो. 

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment