पीएम किसान 20वा हफ्ता पात्र यादी जाहीर यादीत नाव चेक करा Pm Kisan Yojana 20th Hafta

Published On: June 27, 2025
Follow Us
Pm Kisan Yojana 20th Hafta

Pm Kisan Yojana 20th Hafta पीएम किसान योजना संदर्भात नवीन महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता नवीन तारीख त्याचबरोबर यादी जाहीर झालेली आहे. आपण ₹2000 हजार रुपये कोणाला मिळणार आहे. तुमच्या गावात कोणकोणती लाभार्थी हे 20वा हप्ता घेण्यासाठी पात्र.? याची सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आणि शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असलेली मोठी योजना आहे.

योजनेतून वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात, प्रत्येक 04 महिन्यानंतर 2 हजार रुपये पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत 19 हफ्ते खात्यात जमा झाले आहेत, हे तुम्हाला माहीतच असेल तर आज आपण या ठिकाणी पात्र लाभार्थी यादी आणि Know Your Status काय हे कसं चेक करायचं आहे आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

Pm Kisan Yojana 20th Hafta लाभार्थी यादी जाहीर

प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांना मिळावा यासाठी वारंवार सरकार प्रयत्नशील आहे. अपात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी योजनेतून बाहेर करून त्यांच्याकडून वसुली देखील केली जात आहे अन् पात्र शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे या ठिकाणी आतापर्यंत 19 हप्ते मिळाले आहे. पीएम किसान 20वा हप्त्याची तारीख, नवीन लाभार्थी यादी जाहीर झाली आहे.

पीएम किसान लाभार्थी यादी यादी कशी पहायची.?

पीएम किसान 20वा हप्त्याची तारीख शासनाकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. तरी मीडिया रिपोर्टनुसार 30 जून 2025 पर्यंत ₹2,000 हजार रुपये रक्कम शेतकऱ्यांना जमा केली जाऊ शकते. 10 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 20वा हफ्ताचा लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

या संदर्भात सरकारचे नवीन निर्देश योजनेचे लाभ वेळेवर मिळवण्यासाठी सरकारने काही नवीन नियम जारी केलेले आहेत. यातील खालील नियम पाळावे लागणार आहे.

  • डीबीटी खाते सक्रिय असणे गरजेचे
  • जमिनीचे सत्यमापन पूर्ण करावे लागणार
  • केवायसी अपडेट
  • मोबाईल नंबर पोर्टलवर नोंदणीकृत आवश्यक

या सर्व गोष्टी विचार पूर्ण करणारे त्या kyc गरजेचे, बँक खाते लिंक करणे आवश्यक हे सर्व असेल तर या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळविण्यस अडचण नाही.

पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन कशी पहावी.?

तुमचं नाव यादीमध्ये आलेला आहे की नाही.? हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ वेबसाईटला भेट द्यायची आहे.
फार्मर कॉर्नर या विभाग वर या
लाभार्थी बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक करा
राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव निवडा
यादी स्क्रीनवर दिसून येईल
जिथे तुमचं नाव आहे की नाही हे तुम्हाला पाहायला मिळणार

अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण गावाची यादी या ठिकाणी पाहू शकतात.

Pm किसान स्वतःच स्टेटस कसं पाहायचे..?

यासाठी तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टी आवश्यक ते खाली दिले आहेत.

  • फार्मर कॉर्नर वर गेल्या नंतर know your status यावर क्लिक करा
  • तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार कार्ड नंबर टाका
  • get report वर क्लीक करून स्वतःचं वैयक्तिक स्टेटस पाहू शकता

अशा पद्धतीने हे 2 पर्याय आहेत, जर तुम्ही संपूर्ण गावाची यादी पाहू शकता. दुसरी यादी म्हणजे तुमचं स्टेटस पाहू शकता, आता ही होती PM किसान संदर्भातील नवीन लाभार्थी यादी अशाच महत्त्वाच्या योजनांच्या माहितीसाठी आपल्या वेबसाईटवर नवीन आला असेल तर दररोज भेट द्यावी धन्यवाद.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment