शेतकऱ्यांना टोकन यंत्र खरेदीसाठी 10 हजार रुपये अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरू Tokan Yantra Anudan Yojana

Published On: June 26, 2025
Follow Us
Tokan Yantra Anudan Yojana

Tokan Yantra Anudan Yojana शेतकऱ्यांना टोकन यंत्रासाठी 10 हजाराचा अनुदान मिळणार आहे यासाठी अर्ज कसे करायचे आहेत.? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत. टोकन यंत्र ही शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या पेरणी करिता उपयुक्त ठरते, आणि भरपूर माणसाचे काम हे एकच मशीन एका दिवसात करत असते हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

टोकण यंत्र आणि पेरणी करणे योग्य अंतर आहे. यामुळे वेळेचे बचत, श्रमाची बचत या सर्वांचे बचत होते आणि यासाठी शासनाने अनुदान देण्यास देखील सुरुवात केलेली आहे. आता टोकण यंत्र अनुदान योजना 2025 ऑनलाईन अर्ज कसा करावा.? याची स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती खाली आपण पाहणार आहोत.

Tokan Yantra Anudan Yojana महाराष्ट्र 2025

टोकन यंत्र योजना महाराष्ट्र 2025 बाबत थोडक्यात माहिती शासनाच्या कृषी विभाग अंतर्गत राबवली जाते, छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांना ही योजना वरदान पेक्षा कमी नाही त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला टोकन यंत्र घ्यायची असेल तरी माहिती तुमच्यासाठी चांगली आहे. योजनेचा लाभ किंवा अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टवर कृषी यांत्रिकीकरण सोबत योजना सध्या सुरू आहे. पात्र लाभार्थ्यांना निवड झाल्यानंतर 10 हजार रुपये पर्यंतचा अनुदान मिळत आहे.

टोकन यंत्र योजना 2025 पात्रता निकष

शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
अर्जदाराकडे स्वतःच्या नावाची शेतजमीत असणं आवश्यक अगोदर टोकण यंत्र योजनेचा लाभ घेतलेला नसावा
अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिक प्राधान्य दिले जाणार

टोकन यंत्र अनुदान योजना 2025 आवश्यक कागदपत्रे लिस्ट

डिजिटल सातबारा उतारा
होल्डिंग उतारा
टोकन यंत्राचा टेस्ट रिपोर्ट
यंत्राचे कोटेशन
विक्रेताचे डीलरशिप असलेले प्रमाणपत्र

या ठिकाणी हे कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

टोकन यंत्र निवड झाल्यानंतर लागणारी आवश्यक कागदपत्रे लिस्ट

ओरिजनल बिल
आरटीजीएस पावती
डिलिव्हरी चलान

टोकन यंत्र अनुदान योजना ऑनलाइन अर्ज कसा करायचा..?

टोकन यंत्र योजनाचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी फार्मर पोर्टलवर या या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही अगोदर नोंदणी केली नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या
त्यानंतर पोर्टलवर गेल्यानंतर लॉगिन करा
लॉगिन केल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण योजना हा पर्याय निवडा
अर्ज करताना सोबतची कागदपत्रे इतर माहिती सादर करा

जेव्हा तुमची टोकन यंत्रासाठी निवड होईल त्यावर तुम्हाला मेसेज आणि वेबसाईट वरती माहिती मिळेल. अशाच माहितीसाठी आपल्या वेबसाईटला भेट देत रहा.

Bajrang Patil

🙋‍♂️ I’m Bajrang Patil, founder of SmartBaliRaja.co.in. With 6 years of writing experience, I share updates on government schemes, agriculture, and rural news to keep people informed and empowered. 📲 For the latest updates, follow me on Instagram: 👉 Follow on Instagram

Leave a Comment